गुहागर | प्रतिनिधी : तालुक्यातील चिखली येथे फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर आयोजित विध्यार्थी व्यक्तिमत्त्व शिबिर उत्साहात पार पडले.
सेवा भारती कोकण प्रांत, फिरती विज्ञान प्रयोगशाळा प्रकल्प गुहागर यांच्या सहकार्याने या गुहागर तालुक्यातील वीस शाळांमध्ये फिरती विज्ञान प्रयोगशाळा हा प्रकल्प राबविला जातो या प्रकल्पांतर्गत प्रकल्प शिक्षक श्री रवींद्र जयवंत खांडेकर हे या शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रयोग दाखवितात या प्रकल्पांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम राबविले जातात याचाच एक भाग म्हणून विद्यार्थी व्यक्तिमत्व शिबिर हे चिखली ओमकार मंगल कार्यालय या ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये गुहागर तालुक्यातील वीस शाळांमधून 101 विद्यार्थी निवासी शिबिरासाठी सहभागी झाले होते.या शिबिरामध्ये विविध उपक्रम घेण्यात आले. यामध्ये पहिले सूत्र राजू सुर्वे आणि संजय कुळे यांनी कार्यानुभव अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारची फुले कागद काम पुठ्ठा काम करवंटी पासून बनवण्याच्या विविध वस्तू त्याचप्रमाणे आपण टाकाऊतून टिकाऊ वस्तू कशा बनवू शकतो याबद्दल उत्तम असं मार्गदर्शन केले
या संपूर्ण शिबिरामध्ये अनोखे सत्र ठरलं ते भारत माता पूजन यावेळी संध्याकाळी सर्व विद्यार्थ्यांनी भारत मातेचे पूजन केले यानंतर प्रांत संघटनमंत्री सुरेंद्रजी भवरलाल शर्मा यांनी भारतमातेच्या पूजनाचे महत्त्व विषद. केले आपण विद्यार्थी म्हणून भारतमातेचे पूजन प्रत्यक्ष जीवनामध्ये दररोज कशाप्रकारे करू शकतो हे विविध उदाहरणे आणि दाखल्यांद्वारे विद्यार्थ्यांना पटवून दिले. पुढील सत्रामध्ये रत्नागिरी जिल्हा परिषद आयोजित जाणू विज्ञान अनुभव विज्ञान या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या इस्त्रो नासा निवड चाचणी परीक्षेमध्ये निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या सर्व विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. यामध्ये सोहम समीर बावधनकर, स्वरा संतोष लांजेकर, पूर्वा उमेश जाधव, सानवी संजय सांगळे, अभिनव मनोज शिंदे, निर्विघ्न नकुल वायंगणकर, कौशल्य सुहास धनावडेआणि अनुश्री चंद्रकांत गिजे या विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेमध्ये यशस्वी झालेल्या वेदिका संतोष तुळसणकर, अंतरा विनोद धुमाळ आणि सानवी संजय कानसे या विद्यार्थिनींना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.रात्री भोजनांतर घेण्यात आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण सत्रामध्ये श्री विवेक जोशी यांनी आपल्या कलागुणांनी विद्यार्थ्यांना खळखळून हसवून सोडले. विद्यार्थ्यांसमोर विविध नकला आणि गाण्यांचे उत्कृष्ट सादरीकरण केले विविध विद्यार्थ्यांनी आपले कला गुण दाखवून नृत्य वादन अशा कला या शेवटच्या सत्रामध्ये सादर केल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी एकात्मता स्तोत्र, एकात्मता मंत्र, संघ स्थान घेण्यात आले. यानंतर घेण्यात आलेल्या सत्रामध्ये श्री दीपक यादव यांनी विद्यार्थ्यांना विविध बाबींचे मार्गदर्शन केले त्यांना शालेय जीवनातील विविध अनुभवून सांगून खिळवून ठेवले. आपल्या ओघपूर्ण भाषेने विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केले.
सेवा भरती कोकण प्रांत सचिव श्री आनंद मनोहर रावळ यांनी विद्यार्थ्यांना विविध सेवा कार्यांची माहिती आपल्या सत्रामध्ये दिली ही सेवाकार्य उभी करण्यासाठी विविध कार्यकर्ते कसे उभे राहतात आपल्या पुढील आयुष्यामध्ये आपणामधून सुद्धा असे कार्यकर्ते उभे राहावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. शेवटच्या समारोपाच्या सत्रात गंगारामजी इदाते यांनी जनकल्याण समितीची स्थापना कशी झाली? सेवा कार्य कशी उभी होत गेली ? आपण त्या सेवा कार्यामध्ये कसे आलो ? विद्यार्थ्यांनी ही आपल्या गावामध्ये, इतर ठिकाणी सेवाकार्यामध्ये कशी मदत करावी याबद्दल मार्गदर्शन केले कार्यकर्ता कसा असावा याची माहिती सर्वांना दिली. यानंतर प्रथमेने शिबिराची सांगता झाली.
या शिबिरामध्ये सेवाभाती कोकण प्रांत सचिव आनंद मनोहर राऊळ, संघटन मंत्री सुरेंद्रजी भवरलाल शर्मा, प्रांत शिक्षण आयाम प्रमुख तथा प्रांत प्रशिक्षण प्रमुख धनंजय प्रभाकर जठार, तर रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष अजयभाई मेहता, सचिव विवेक मधुकर पटवर्धन, गंगारामजी इदाते, पूर्णवेळ कार्यकर्ता हेमंत भगवान आईर, मोहन भाई संसारे, शिबिर प्रमुख आणि प्रकल्प प्रमुख मनोहर पवार, गुहागर तालुका कार्यवाह अनिल ओक ,गुहागर उपखंड प्रमुख मयुरेश प्रमोद बावधनकर , पूर्णवेळ कार्यकर्ता दिलीप सखाराम काजवे ,प्रकल्प समिती सदस्य पूजाताई कानिटकर, पालपणे नं. 2 शाळेचे मुख्याध्यापक दत्ताराम समगिस्कर आदी मान्यवरव उपस्थित होते. शिबिराचे मुख्य शिक्षक म्हणून दिनेश नाटेकर आणि मुख्य शिक्षिका म्हणून चिन्मय लेले हिने काम पाहिले गणशिक्षक म्हणून भगीरथ राणे, रोशन मिसाळ, अदिती काजवे यांनी काम पाहिले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहप्रकल्प प्रमुख श्री दिनेश काशिनाथ जाक्कर यांनी केले. व्यवस्थापक म्हणून रवींद्र खांडेकर, दर्शना समगिस्कर, रामदास गिजे आणि पालक वर्ग यांनी काम पाहिले












