आचरा खार बंधाऱ्याची नादुरुस्त झडपे खारभूमी विभागाकडून तात्काळ दुरुस्त
ग्रामस्थ शेतकरी यांनी मानले माजी खासदार निलेश राणे यांचे आभार
मालवण : आचरा गाऊडवाडी, काझीवाडा, भंडारवाडी व डोंगरेवाडी भागातील खाजनसदृश्य भागाच्या खार बंधाऱ्याची झडपे तुटून पडल्याने खाडीचे खारे पाणी भातशेती जमीन भागात घुसल्याने सुमारे शेकडो एकर शेतजमीन ही खाऱ्या पाण्यामुळे बाधित झाली होती. याबाबत माहिती मिळताच माजी खासदार निलेश राणे यांनी प्रत्यक्ष त्या ठिकाणी बंधाऱ्यावर जात पाहणी केली. दरम्यान, खारभूमी विकास विभागाचे सहाय्यक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांना नादुरुस्त झडपे तात्काळ दुरुस्त करण्याबाबत तसेच योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या.
दरम्यान दोन दिवसात खारभूमी विभागाने तात्काळ कार्यवाही करत नादुरुस्त झडपे दुरुस्त केली आहेत.उपाभियंता जाधव व सहायक अभियंता स्वप्नील होडावडेकर यांचं तत्पर कामाबाबत भाजपच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. यावेळी भाजप तालुका अध्यक्ष धोंडू चिंदरकर, खरेदी विक्री संघांचे चेअरमन राजन गावकर माजी जिल्हापरिषद सदस्य जेरोन फर्नांडिस, भाजप शक्तिकेंद्र प्रमुख जगदीश पांगे उपस्थित होते. माजी खासदार निलेश राणे साहेब यांनीही फोन द्वारे अधिकारी वर्गाचे आभार मानले.ग्रामस्थ शेतकरी यांनी भाजप व निलेश राणे यांच्या तत्पर कार्याचे कौतुक करत आभार मानले आहेत.