एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

प्ले स्कूलची विद्यार्थिनी सोनाक्षी मेहता हिने इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये आपले स्थान केले निश्चित

चिपळूण (प्रतिनिधी)—: चिपळूण शहरा नजीक कापसाळ गावी निसर्गरम्य परिसरात वसलेल्या चिपळूण मधील नामवंत एसीबी इंटरनॅशनल स्कूलच्या मार्कंडी येथील प्ले स्कूलची बालविद्यार्थिनी कृ . सोनाक्षी विनीत मेहता हिने केवळ पाच वर्ष वयातच शिक्षणात विविध विषयात नेत्रदीपक कामगिरी करून लहान वयातच आपले नाव इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंदविले आहे.

पाच वर्ष तीन महिने वयाची एसीबी इंटरनॅशनल स्कूल मार्कंडी शाखेत एल.के.जी वर्गात शिक्षणाऱ्या सोनाक्षी हिने २९ फळे, २६ क्रियापदे ओळखणे आणि आठवणे, ७६ सामान्य ज्ञान प्रश्नांची उत्तरे देणे, ज्यामध्ये ३५ आरोग्यविषयक परिस्थिती व त्यावर नैसर्गिक उपाय, २२ फळे व भाज्या, ३ वनस्पती, १६ वास्तुशास्त्र प्रश्न; तसेच ७ श्लोक पठण करण्याचा अद्वितीय विक्रम केला आहे. विशेष म्हणजे,सोनाक्षी डोळ्यांनी शरीर स्कॅन करून संबंधित आरोग्य स्थिती ओळखते आणि कोणते फळ खावे याबाबत मार्गदर्शन करते. तिला फळ थेरपीमध्ये विशेष रस असून तिचे सर्व ७६ प्रश्न आरोग्य समस्या,फळे आणि वनस्पती उपायांशी संबंधित आहेत.

तिच्या या अनोख्या कौशल्यामुळे दिल्ली येथे नुकत्याच झालेल्या स्पर्धेत तिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड India Book of Records २०२५ यंगेज आरबीआर आर्चीव सन्मानाने गौरविण्यात आले यावेळी तिला सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देण्यात आले . तिची आई कल्याणी विनीत मेहता या बाल व युवा विकास प्रशिक्षक असून चिपळूण येथे ब्रेन अँड माईंड फिटनेस सेंटर चालवतात तिचे वडील विनीत नंदकुमार मेहता हे लोटे येथील एबी माऊरी कंपनीत मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत.

एसीबी इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत भोजने,चेअरमन सौ.सायली भोजने,अँड.अमोल भोजने,संचालक पूजा खताते,गुणवत्ताधिकारी नेहा महाडिक, मुख्याध्यापक राकेश भूरण,पर्यवेक्षक मुकुंद ठसाळे, राकेश टिळक यांनी शाळेत सोनाक्षीचा भव्य सत्कार केला तसेच शाळेतील शिक्षकांनी सोनाक्षी मेहता हिचे विशेष अभिनंदन केले आहे.