रत्नागिरीत रविवारी भाट्ये समुद्रकिनारी होणार “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रम

“Mega Beach Cleaning Event” initiative will be held at Bhatye beach in Ratnagiri on Sunday

जिल्हा प्रशासनाकडून सकाळी 6 वाजता सुरू होणार स्वच्छता मोहीम; *स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जी-20 च्या पार्श्वभूमीवर आयोजन

रत्नागिरी| प्रतिनिधी : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, जी-20 परिषद या पार्श्वभूमीवर “मेगा बीच क्लिनिंग इव्हेंट” उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाट्ये समुद्रकिनारा या ठिकाणी रविवार, दि.21 मे 2023 रोजी सकाळी 6 ते 8 या वेळेत समुद्रकिनारा सामूहिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे.
या उपक्रमाकरिता केंद्रीय पर्यावरण मंत्रालय, नवी दिल्ली चे उपसचिव श्री.शंकर लाल बैरवा , जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग, रायगड जिल्हा पोलीस विभाग यांच्यासह इतर विविध शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचा संकल्प केला आहे.
या मोहिमेत सर्व शासकीय निमशासकीय विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी, नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी तसेच प्रसारमाध्यम प्रतिनिधींनीही मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले आहे.