RATNAGIRI: “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत 24 मे रोजी जिल्हा प्रशासनाकडून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन

A grand employment fair was organized by the district administration on 24th May under the initiative “Sasan Aipana Dari”.

खासगी कंपन्यांकडून 500 हून अधिक पदांसाठी मागणी

रत्नागिरी : “शासन आपल्या दारी” उपक्रमांतर्गत जिल्हयातील बेरोजगार उमेदवारांना विविध क्षेत्रातील रोजगारांच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या पुढाकारातून जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र आणि जिल्हा उदयोग केंद्र यांच्या संयुक्त विदयमाने “पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा” बुधवार,दि.24 मे 2023 रोजी सकाळी 10 वाजता औदयोगिक प्रशिक्षण संस्था, नाचणे रोड, रत्नागिरी येथे आयोजित करण्यात येणार आहे.

या रोजगार मेळाव्याकरिता विविध खाजगी आस्थापनांकडून 500 हून अधिक रिक्त पदांची मागणी करण्यात आलेली आहे. यानुसार 10 वी/12 वी / पदवीधर/आय.टी.आय / इंजिनिअर तसेच इतर शैक्षणिक पात्रता असणाऱ्या बेरोजगार युवक-युवतींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा. रोजगार मेळाव्याच्या दिवशी मुलाखतीकरिता बायोडेटा व इतर कागदपत्रांच्या प्रतींसह प्रत्यक्ष उपस्थित राहणे अनिवार्य आहे.
जिल्ह्यातील बेरोजगार युवक-युवतींनी बुधवार, दि.24 मे 2023 रोजी आयोजित या भव्य रोजगार मेळाव्यात सहभागी होऊन रोजगार संधीचा लाभ घ्यावा, अधिक माहितीकरिता या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक 02352- 221478 / 299385 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त, कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन केंद्र, रत्नागिरी श्रीम. इनुजा शेख यांनी केले आहे.