खेड बसस्थानकातून १० जादा बसेस

खेड (प्रतिनिधी) शिमगोत्सवासाठी येथील एसटी प्रशासनाने १० जादा बसफेऱ्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये सकाळी ९.३० वाजता खेड-बोरिवली, १०.१५ वाजता शिवतर-बोरिवली, ११ वाजता खेड-कल्याण, ११.३० वाजता खेड-ठाणे, रात्री ९ वाजता खेड-मुंबई, रात्री ९ वाजता खेड-बारिवली, रात्री १०.१५ वाजता शिवतर-बोरिवली, रात्री ९ वाजता खेड-कल्याण, रात्री ९ वाजता खेड-ठाणे, सकाळी ८ वाजता खेड-मुंबई आदी बसफेऱ्यांचा समावेश आहे. बसफेऱ्यांचे आरक्षण देखील खुले झाले आहे. या बससेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आगारप्रमुख रणजित राजेशिर्के, कोकण एसटी प्रेमी ग्रुपचे जनसंपर्कप्रमुख साहील हुंबरे यांनी केले आहे.