आंबोलीतील आदर्श महिला ग्रामसंघाचा वर्धापन दिन साजरा

आंबोली । प्रतिनिधी : आंबोली गावातील आदर्श महिला ग्रामसंघाचा वर्धापनदिन महिलांच्या उपस्थितीत उत्साहात साजरा करण्यात आला. आंबोली गावच्या प्रथम नागरिक सरपंच सौ. सावित्री पालेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी आंबोली प्रभाग समन्वयक श्री. राठोड , जि. प. तळवडे प्रभागच्या बीडीएसपी श्रुती रेडकर, रेवती वालावलकर, आंबोली गावातीला सी आर पी,ग्रामसंघ पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्या तसेच सर्व समुहातील सदस्य, शाळेच्या मुख्याध्यापिका शिक्षिका व शाळेतील मुले उपस्थित होती.

यावेळी आदर्श महिला ग्रामसंघाचा ७ वा वर्धापन दिन केक कापुन साजरा करण्यात आला. तसेच जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिलांनी भाषणे, विविध गाण्यावर नृत्य तसेच इतर कलाविष्कार सादर केले.