दापोली l प्रतिनिधी:- क्षेत्रीय कार्यालयासाठी शंभर दिवसांच्या कृती आराखडा कार्यक्रमा अंतर्गत रविवार दिनांक १६ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी कार्यालय दापोली आणि तहसील कार्यालय दापोली यांच्या संयुक्त विद्यमाने हर्णे सुवर्णदुर्ग किल्ल्याची स्वछता करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदुष्टीचे प्रतिक असणाऱ्या व सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या पराक्रमाची साक्ष देणारा हर्णे येथील सुवर्णदुर्ग किल्ला ओळखला जातो.
महसुल विभागातर्फे कृति आराखडा कार्यक्रमांतर्गत साफसफाई अभियान च्या किल्ल्यावरील बुर्जावर वाढलेली झाडे झुडपे, गवत तसेच चोर दरवाजा मुख्य प्रवेशद्वार तोफखाना, विहीर तलाव,
आतील व बाहेरील प्लास्टिकच्या बॉटल्स व इतर कचरा गोळा करून नष्ट करण्यात आला.
सदर स्वच्छता मोहीममध्ये उपविभागीय अधिकारी दापोली श्री. सूर्यवंशी सर, तहसीलदार अर्चना बोंबे,नायब तहसीलदार आडमुठे, वैशंपायन रावसाहेब तसेच महसूल विभागाचे कार्यालयीन सर्व कर्मचारी, मंडळ अधिकारी, तलाठी उपस्थित होते.
इतिहासाची साक्ष देणारे हर्णे येथे 16 व्या शतकात बांधलेले 4 किल्ले आहेत . छत्रपती शिवाजी महाराज यांचे आरमार याच ठिकाणी होते, पाण्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी बाजूलाच भुईकोट, कनकदुर्ग, फत्तेगड असे तीन किल्ले आहेत. सुवर्णदुर्ग किल्ल्याला जागतिक वारसा प्राप्त होणार असल्याने या किल्ल्याला गतवैभव प्राप्त होणार आहे. तसेच या ठिकाणी जागतिक पर्यटक येणार असल्याने सुवर्णदुर्ग किल्ल्याचे नाव जगाच्या नकाशावर सुवर्णाक्षरात कोरले जाणार आहे.











