A terrible accident in the car of devotees while returning from Pandharpur for darshan, 3 killed, 7 injured
बुलडाणा, : बुलडाणा जिल्ह्यातून मोठी बातमी समोर येत आहे. शेगाव शहरात भाविकांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. हे भाविक विठ्ठलाचे दर्शन घेऊन पंढरपूरहून आपल्या गावी परतत होते.
शेगाव शहराच्या वेशीजवळ लावलेल्या खांबाला भाविकांच्या चारचाकी वाहनाने धडक दिली. या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले, तर सात भाविक गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यातील काही भाविक गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अकोल्याला हलविण्यात आले आहे.
दर्शन करून परतत असताना झालेल्या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, बुलडाणा जिल्ह्यातील काही भाविक पंढरपूर येथे दर्शनासाठी गेले होते. दर्शन करून परतत असताना शेगाव शहराच्या प्रवेशद्वाराजवळ उभारलेल्या खांबाला भाविकांचे वाहन धडकले. हा अपघात इतका भीषण होता की तीन भाविक जागीच ठार झाले. तर सात जण गंभीर जखमी झाले आहेत.
स्थानिकांच्या मदतीने जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. माता न तू वैरिणी; आईनेच आपल्या मुलींना वेश्याव्यवसायात विकले; नागपुरात घडलेल्या घटनेमुळे चालकाला झोप लागल्याने अपघाताचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. मात्र चालकाला झोप लागल्याने कार खांबावर आदळल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेतील मृत आणि जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.