आमदार निलेश राणे यांना उदंड आयुष्य लाभो…

मालवण शिवसेना महिला आघाडीच्या वतीने श्री देव रामेश्वर चरणी साकडे

मालवण | प्रतिनिधी : कार्यसम्राट आमदार निलेश राणे यांचा वाढदिवस मतदार संघात मोठया उत्साहात साजरा होत आहे. विविध सामाजिक उपक्रम राबवले जात आहेत. शिवसेना मालवण महिला आघाडी यांनी देऊळवाडा येथे मालवण ग्रामदैवत श्री देव रामेश्वर चरणी आमदार साहेबाना उदंड आयुष्य लाभो यासाठी साकडे घातले.

 

यावेळी शिवसेना महिला आघाडी उपजिल्हा संघटक निलम शिंदे, युवती सेना जिल्हा अध्यक्षा सौ. सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक सौ. अंजना सामंत, उपतालुकाप्रमुख गीता नाटेकर, सोशल मीडिया प्रमुख पारकर आणि महिला कार्यकर्त्या उपस्थितीत होत्या.