लांजा (प्रतिनिधी) लांजा तालुक्यातील गवाणे गावचे पोलीस पाटील रवींद्र कोटकर यांना राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार पुरस्काराने गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा पोलीस पाटील संघाचे सचिव आणि लांजा तालुक्यातील गवाणे गावचे पोलीस पाटील असलेले रवींद्र कोटकर यांना बुलढाणा येथील तथागत बहुउद्देशीय संस्था मेकर सामाजिक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने राज्यस्तरीय साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला होता .हा पुरस्कार आज लांजा पोलीस ठाणे येथे झालेल्या कार्यक्रमात पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या हस्ते त्यांना प्रदान करण्यात आला .
या कार्यक्रमाप्रसंगी लांजा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सरंगळे, बीट अंमलदार नासिर नावलेकर यांच्यासह भांबेड, कुरचुंब, चाफेट ,वेसुर्ले व पन्हळे या गावचे पोलीस पाटील उपस्थित होते











