
_______
नाशिक येथे जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा सिद्ध पादुका दर्शन सोहळा भक्तीमय वातावरणात झाला. येथील गोल्फ क्लब मैदानावरील या कार्यक्रमाला हजारो भाविकांची उपस्थिती होती. याप्रसंगी जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या सामाजिक उपक्रमांतर्गत गरीब, गरजू शालेय विद्यार्थिनींना ७० सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले.
सोहळ्यास उपस्थित असलेल्या मान्यवरांच्या हस्ते हे सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, महंत भक्तिचरणदास महाराज, महंत श्रीदास महाराज, भाजपा नेते लक्ष्मण सावजी, शिवसेना ( शिंदे गट) जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते, यांच्यासह स्वस्वरूप सांप्रदायातील भक्तगण आणि पदाधिकारी उपस्थित होते.
प्रारंभी जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रामकुंड येथून शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत विविध प्रकारचे पथके सहभागी झाली होती.










