खेडमध्ये रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा

खेड (प्रतिनिधी) शहरातील तांबे मोहल्ला येथील रिक्षाचालक जावेद शरफुद्दीन तांबे (४४) यांनी प्रवाशाचे राहिलेले पाकिट परत करुन प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले. त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक होत आहे. भरणे-शिवनेरीनगर येथे वास्तव्यास असलेल्या कार्ले दाम्पत्याने शहरातील सिध्दीविनायक मंदिर येथून शिवनेरी नगरपर्यंत ताबे यांच्या रिक्षाने प्रवास केला. या प्रवासादरम्यान कार्ले यांची ८ हजार रुपये व महत्वपूर्ण कागद असलेले पाकिट रिक्षातच राहिले होते. प्रवासानंतर रिक्षा चासकाने पाकिटातील कागदपत्रावरील पत्यावरुन गाठून पाकिट त्यांच्या स्वाधीन केले.