फिनोलेक्स अकॅडमी मध्ये नेत्र तपासणी शिबीर संपन्न

रत्नागिरी : फिनोलेक्स अकॅडमी नेहमीचं विद्यार्थ्यांना चांगल्या तांत्रिक ज्ञानासोबत आरोग्याविषयी जागरूक करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबवित असते. याच अंतर्गत इंफिगो आय केअर रत्नागिरी व राष्ट्रीय सेवा योजना युनिट, फिनोलेक्स अकॅडमी ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी (एफएएमटी), रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी शिबीराचे आयोजन फिनोलेक्स अकॅडमी मध्ये दिनांक ०७ मार्च २०२५ रोजी केले होते.

 

या सत्राचे उद्घाटन फिनोलेक्स अकॅडमी चे प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांनी केले. इंफिगो आय केअरच्या डॉ. शितल साळुंके यांनी आपल्या चुकिच्या जीवन शैलीमुळे उध्दभवणाऱ्या निरनिराळ्या नेत्ररोगाविषयी, तसेच ते होऊ नयेत म्हणून घ्यावयाची काळजी याबाबत उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थींनी, प्राध्यापक व कर्मचारी यांना मार्गदर्शन केले. या शिबिरामध्ये एकूण १७५ विद्यार्थी व विद्यार्थींनी, प्राध्यापक व कर्मचारी यांची नेत्र तपासणी करण्यात आली. प्राचार्य डॉ. कौशल प्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम अधिकारी, एनएसएस युनिट प्रा.उमेश के सामंत, प्रा.सचिन गुरव, प्रा.प्रियांका दाते, प्रा. सौरभ शहाणे यांनी हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडला.