‘त्या’ दोन पसार संशयितांचा शोध सुरूच

crime missing

खेड(प्रतिनिधी)तालुक्यातील संगलट येथील एकास धमकावत त्याच्याकडून ६० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी अटकेतील अब्दुल्ला नाडकर याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात सहभागी असलेले अन्य दोन संशयित अजूनही पसार असून येथील पोलिसांकडून त्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे.

 

संगलट-दवंडेवाडी येथील प्रकाश महादेव महाडिक यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, खंडणी उकळल्याप्रकरणी

फरार झालेल्या अब्दुल्ला नाडकर याच्या मुसक्या आवळल्या होत्या. त्याच्याकडून खंडणीतील १० हजाराची रक्कम पोलिसांनी हस्तगत केली होती. या प्रकरणात आणखी दोघांचा सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्यानंतर पोलीस संशयितांच्या मागावर होते. हे दोघेही येथून पसार झाले आहेत. खंडणीतील ५० हजाराची रक्कम दोघांकडे असल्याची कबुली नाडकर यांनी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस दोघांचाही शोध घेत आहेत. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले करत आहेत.