तुमचे व्हीडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकतो अशी डॉक्टरना धमकी देणाऱ्या तिघांवर गुन्हा

कळंबणी उपजिल्हा रुग्णालयातील प्रकार  
खेड(प्रतिनिधी)
कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्या तिघांवर सरकारी कामात अड्यळा निर्माण केला म्हणून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १८ मार्च रोजी सांयकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली.
सुरेश जालिंदर मोहीते,संभाजी परशुराम मोहीते, शितल सुरेश मोहीते अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. या प्रकरणी डॉ. तुषार गणेश खडोळ,( वय-२६वर्षे, -डॉक्टर, रा-उपजिल्हा रुग्णालय कळंबणी) यांनी तक्रार दाखल केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार एका महिलेच्या डोक्यास मार लागल्यामुळे औषधोपचाराकरीता त्यांचे नातेवाईकांसोबत आल्या, फिर्यादी यांनी पेशंट यांना अपघात कक्षातच अॅडमीट केले. दुपारी २.०० वा.चे सुमारास डॉ. अनिकेत खडोळ हे त्यांच्या कामानिमित्त दवाखान्यात येवून अपघात विभागात त्यांचं काम करत होते. दुपारी ०२.३० वा.चे सुमारास महिला पेशंट मोहीते यांचेवर औषधोपचार करीत असताना सुरेश मोहीते व संभाजी परशुराम मोहीते हे तेथे आले. त्यांनी फिर्यादी यांना तुम्ही आमच्या पेशंटवरती नीट औषधोपचार करीत नाही, आमच्या औषधोपचाराच्या कागदपत्रात फेरफार करताय असे बोलून मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागले व अरेरावीची भाषा केली.
तसेच आम्ही तुमचे व्हीडीओ बनवून सोशल मिडीयावर टाकतो अशी धमकी देवून फिर्यादी यांची व्हिडीओ शुटींग केली, त्याचेळी फिर्यादी व त्यांचा स्टाफ तसेच डॉ. अनिकेत यांनी मिळून त्यांना तुम्ही शांत रहा, आम्हाला पेशंटवरती औषधोपचार करु द्या असे समजावून सांगत असताना त्यांनी फिर्यादी यांचे काही एक न ऐकता मोठमोठ्याने आरडा ओरड करुन दवाखान्यातील इतर रुग्णांना त्रास होईल असे वर्तन केल्याने फिर्यादी यांच्या शासकीय कामात अडथळा निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.