खेड(प्रतिनिधी)कोकण मार्गावर उन्हाळी सुट्टी हंगामात नियमित रेल्वे गाड्यांना प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने सीएसएमटी -करमाळी, एलटीटी-करमाळीसह एलटीटी- तिरवअनंतपुरम साप्ताहिक उन्हाळी स्पेशलच्या फेऱ्या जाहीर केल्या.
या स्पेशलच्या फेऱ्या १० एप्रिलपासून धावणार असल्याने चाकरमान्यांसह पर्यटक सुखावले आहेत. आरक्षण खुले होण्याकडेच नजरा खिळल्या आहेत. ०११५१ / ०११५२ क्रमांकाची सीएसएमटी – करमाळी साप्ताहिक स्पेशल १० एप्रिल ते ५ जूनपर्यंत धावेल. दर गुरुवारी सीएसएमटीहून रात्री १२:२० वाजता सुटून त्याच दिवशी दुपारी १.३० वाजता करमाळीला पोहोचेल. परतीच्या प्रवासात करमाळीहून दुपारी २.१५ वाजता सुटून पहाटे ३.४५ वाजता सीएसएमटीला पोहोचेल.
०११२९ / ०११३० क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस -करमाळी साप्ताहिक स्पेशल १० एप्रिल ते ५ जूनदरम्यान धावेल. स्पेशल एलटीटीहून रात्री १०.१५ वाजता सुटून दुसऱ्या या दिवशी दु.१२ वाजता करमाळीला पोहचेल.. परतीच्या प्रवासात ११ एप्रिल ते ६ जूनपर्यंत दर शुक्रवारी धावणारी स्पेशल करमाळी येथून दुपारी २.३० वाजता सुटून पहाटे ४ वाजून ५० मिनिटांनी एलटीटीला पोहचेल. ०१०६३/०१०६४ क्रमांकाची लोकमान्य टिळक टर्मिनस-तिरुवअनंतपुरम साप्ताहिक स्पेशल ३ एप्रिल ते २९ मे दरम्यान दर गुरुवारी धावेल. एलटीटीहून सायंकाळी ४ वाजता सुटून दुसऱ्या रात्री १०.४५ वाजता तिरुवनंतपुरम येथे पोहचेल.











