खेड (प्रतिनिधी)
खेड आंबवली मार्गावरील सुकीवली नजीक तीव्र उतारावर अचानक दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकी स्वार जागीच ठार झाल्याची घटना शुक्रवारी सकाळी ११ ३० वाजण्याच्या सुमारास घडली
प्रकाश रामचंद्र कदम ६२ रा पुणे असे त्या जागीच ठार झालेल्या दुचाकी स्वाराचे नाव आहे आपल्या ताब्यातील दुचाकी ने खेडहून आंबवली च्या दिशेने जात असताना सुकीवली नजीकच्या उतारावर दुचाकी वरील त्याचे अचानक नियंत्रण सुटल्याने दुचाकी घसरून अपघात झाला या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला
या अपघाताची माहिती नरेंद्र महाराज संस्थेच्या मोफत रुग्णवाहिकेला मिळताच तत्काळ घटनास्थळी दाखल होऊन दुचाकी स्वार कदम या कळंब णी उप जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले










