कुवारबाव पाटबंधारे कॉलनी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू

dead

रत्नागिरी ः प्रतिनिधी : शहरानजीकच्या कुवारबाव पाटबंधारे कॉलनी येथील प्रौढाचा आकस्मिक मृत्यू झाला. ही घटना गुरुवार 20 मार्च रोजी सकाळी 8.15 वा. घडली.

संतोष महादेव बनसोडे (40,रा.मुळ रा.कर्नाटक सध्या रा.पाटबंधारे कॉलनी कुवारबाव,रत्नागिरी) असे आकस्मिक मृत्यू झालेल्या प्रौढाचे नाव आहे. गुरुवारी सकाळी तो आपल्या रुमच्या बाहेर पायरीवर बेशूध्द अवस्थेत दिसून आला. म्हणून तेथील नागरिकांनी त्याला जिल्हा शासकिय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकिय अधिकार्‍यांनी संतोषला तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.