The grand opening ceremony of Khandala branch of Kharvi Samaj Vikas Urban Cooperative Credit Institution was completed
रत्नागिरी: खारवी समाज विकास नागरी सहकारी पतसंस्था जिल्हा रत्नागिरीच्या खंडाळा शाखेचा उद्घाटन सोहळा मा.डाँ.सोपान शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था रत्नागिरी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
उद्घाटन सोहळ्याच्या प्रारंभीच
खंडाळाच्या बाजारपेठेतील मुख्य चौकात प्रमुख अतिथींचे ढोल ताशांच्या गजरामध्ये फटाक्यांच्या आतश बाजीने स्वागत करण्यात आले. त्यानंतर मिरवणुकीने वाजत गाजत मुख्य उद्घाटन सोहळा कार्यक्रम स्थानी मान्यवरांचे आगमन झाले.
यानिमित्ताने सर्वसाक्षी हाँल खंडाळा येथे सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला मार्गदर्शन करताना अँड.दिपक पटवर्धन यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती लाभली.सभा स्थानी मोठ्या संख्येने उपस्थित जनसमुदाय पाहून पतसंस्थेची नाळ ख-या अर्थाने समाजाशी जोडली गेली असल्याचे नमूद केले. आपण केलेली कर्ज वसुली समाधानकारक असून सामाजिक भावनेत न अडकता कर्जवसुलीसाठी कठोर पाऊले उचलली पाहिजेत असे सांगून खारवी समाजाची सहकार क्षेत्रातील अल्पावधीतच झालेली प्रगती भविष्यात अनेक शाखा निर्मिती करेल असे सांगून सर्व संचालक, प्रशासकीय अधिकारी यांच्या कार्याचे कौतुक केले.
संस्थेला पाच वर्ष पुर्ण व्हायच्या आधीच पाच शाखेची मागणी त्यांच्या जिद्दीने व कौशल्याने परिपूर्ण करणारी महाराष्ट्रातील ही पहिली संस्था आहे. खारवी समाज अल्प जरी असला तरी त्यांची बांधणी केल्यामुळेच पतसंस्थेला यश मिळाल्याचे सांगून जास्तीत जास्त सभासद संख्या वाढवून व सामाजिक बांधिलकी जपत काम करणा-या पतसंस्थेचे कौतुक करून व विविध योजनांची माहिती देऊन त्याप्रमाणे पुढील वाटचाल करावी असे डाँ.सोपान शिंदे यांनी उद्घाटक या नात्याने आपले मनोगत व्यक्त केले.
खंडाळा शाखा निर्मिती करून समाजाच्या आर्थिक विकासाला संजिवनी देईल संस्थेचे आभार मानले .संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा वरवडे गावचे उपसरपंच गजानन हेदवकर यांनी दिले.ग्रामिण भागातील जनतेला संस्थेची शाखा जवळपास नसल्याने आर्थिक व्यवहार करताना कष्ट पडत होते ही समस्या संस्थेने अल्पावधीच दूर केली असे वक्तव्य जांभारी गावचे सरपंच आदेश पावरी यांनी केले.संस्थेच्या एकूणच वाटचालीमध्ये समाधान व्यक्त करत संचालक व प्रशासकीय अधिकारी यांचा एकत्रित सन्मान जांभारी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला.
या कार्यक्रमाला सर्व जिल्हाभरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. यामध्ये मातृशक्ती ची उपस्थिती लक्षणीय होती.कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्था अध्यक्ष संतोष पावरी यांनी तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष सुधीर वासावे यांनी केले.संस्था शाखा निर्मितीसाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांचे आभार संचालिका सौ धृवी लाकडे मानले.