स्प्रिंगच्या शिरेपेचात मानाचा तुरा !

यावर्षीच्या एमएसएमई व युको बँक पुरस्कृत महाराष्ट्राचा उद्योजकता पुरस्काराने सन्मानित

चिपळूण (प्रतिनिधी) – त्वचारोग व समस्यांवर संशोधनात्मक उपचार पद्धतीमध्ये केवळ कोकणातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या कामगिरीने नाव कमावलेल्या स्प्रिंग क्लिनिकला यावर्षीचा एमएसएमई व युको बँकेचा याच कॅटेगरीतील उद्योजकता पुरस्कार प्राप्त झाला आहे . चिपळूणकर नागरिक आणि कोकणातील लोकांना अभिमान वाटावा असा हा सन्मान मिळाल्याबद्दल स्प्रिंगचे मॅनेजिंग डायरेक्टर डॉक्टर यतीन जाधव व त्यांच्या सुविद्य पत्नी वैशाली जाधव यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

 

 

हा पुरकार प्रसिद्ध सिने अभिनेत्री वर्षा उसगावकर , युको बँकेचे झोनल मॅनेजर श्री अमलेश त्रिपाठी व जीएसटी चे महाराष्ट्र राज्य उपायुक्त श्री समाधान महाजन यांच्या शुभ हस्ते बेस्ट स्किन अँड हेअर क्लिनिक ऑफ द इयर या कॅटेगरी मध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला.

 

डॉ. यतीन जाधव हे त्वचा रोग व त्वचा विकार या विषयांमध्ये तज्ञ आहेत. अनेक वर्ष ते या क्षेत्रामध्ये काम करत आहेत व याबाबत नवीन नवीन उपचार पद्धती ही त्यांनी अंमलात आणली आहे. यासाठी त्यांनी अनेक वेळा परदेशात अभ्यास दौरे केलेले आहेत. जगभरातील अनेक तज्ञ व नामवंत त्वचारोग तज्ञांशी त्यांनी चर्चा केलेल्या आहेत. स्प्रिंग क्लिनिक हे कोकणातील अत्यंत अद्ययावत उपचार केंद्र आहे.

 

डॉ. यतीन जाधव याचबरोबर अपरांत मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटचीही जबाबदारी यशस्वीपणे हाताळत आहेत. वैद्यकीय क्षेत्राबरोबरच डॉ. यतीन जाधव हे चिपळूण शहरातील अनेक सामाजिक संस्थांवर काम करत आहेत व आपले सामाजिक दायित्वही मोठ्या प्रमाणावर निभावत आहेत. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीची दखल घेऊन तसेच वैद्यकीय क्षेत्रातील त्यांची गुणवत्ता पूर्ण सेवा आणि क्षेत्रातही मदतीचा हात पुढे करून त्यांनी हे आपले सेवाभावी काम अविरतपणे सुरू ठेवल्याबद्दल त्यांना अनेक पुरस्कारांनी यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे.

 

यावर्षीचा एमएसएमई व युको बँकेचा बेस्ट स्किन अँड हेअर क्लिनिक ऑफ द इयर या कॅटेगरीत स्प्रिंग क्लिनिकला गौरवण्यात आल्याबद्दल त्यांचे हितचिंतक तसेच अनेक सामाजिक संस्थांकडून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या व अभिनंदन करण्यात आले आहे.