शिरगाव (प्रतिनिधी): भाजपचे जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या सौजन्याने देवगड तालुक्यातील चाफेड भोगलेवाडी येथील श्री गायगोठण गणपती मंदिरात सोमवार, दि. २४ मार्च रोजी रात्री ८ वाजता ‘छावा’ या ऐतिहासिक चित्रपटाचे मोफत सादरीकरण करण्यात येणार आहे.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारित हा चित्रपट युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे. सर्व ग्रामस्थांनी या सादरीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजप बूथ कमिटीचे अध्यक्ष सुनील कांडर यांनी केले आहे.











