ओटवणे (प्रतिनिधी)सावंतवाडी पतंजली योग समितीच्यावतीने सोमवार ७ ते शुक्रवार ११ जुलै पर्यंत पाच दिवशीय विनामूल्य योग शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आपले शरीर रोगमुक्त होण्यासाठी, रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी, शरीराचे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, दैनंदिन जीवनात ताण – तणावातून मुक्तता मिळण्यासाठी, पचनक्रिया सुधारण्यासाठी, मधुमेह, उच्च रक्तदाब, कॅन्सर, हृदयरोग सारख्या आजारांवर मात करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी. योगासने, प्राणायम, सुर्यनमस्कार आवश्यक आहेत. घरातील लहानांपासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला सुर्यनमस्कार, प्राणायम, योगासने करून पैसे न खर्च करता निरोगी आरोग्य राखता येते. ओटवणे रवळनाथ विद्यामंदिर येथे सकाळी ५:३० ते ७ या वेळेत या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात
येताना योगा मॅट अथवा चादर, हातरुमाल, पाणी बॉटल सोबत आणावी.
मुख्य मार्गदर्शक शेखर बांदेकर, जिल्हा प्रभारी
पतंजली योग समिती, सिंधुदुर्ग यांचे मार्गदर्शन लाभणार आहे या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









