रत्नागिरी : प्रतिनिधी
शहरानजीकच्या भाट्ये पुलावर झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची ही घटना रविवार 23 मार्च रोजी सायंकाळी 6.15 वा. सुमारास घडली.
महेश अनंत पिलणकर (47,रा.टाकळेवाडी फणसोप,रत्नागिरी) असे अपघातात जागीच मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. महेश पिलणकर हा फिनोलेक्स कंपनीत कामाला होता. रविवारी सायंकाळी तो रत्नागिरीत येत असताना भाट्ये पुलावरील चेकपोस्ट नजीक अज्ञात वाहनाने त्याच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती कि, त्यामुळे महेश हा रस्त्यावर फेकला गेल्याने त्याच्या डोक्याला गंभिर दुखापत होउन त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताची शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करुन उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकिय रुग्णालयात पाठवला. दरम्यान, या अपघातामुळे भाट्ये पुलावर मोठी वाहतुक कोंडी झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत या अपघाताची नोंद शहर पेालिस ठाण्यात करण्याची कार्यवाही सुरु होती.












