ॲड. श्रीकांत पन्हाळे 11 सातारा संघ विजेता

सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धा उत्साहात संपन्न ; पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण

अमित खोत | मालवण : महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील अनेक वकीलांना एकत्र आणण्याचे काम सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग स्पर्धेने केले. वकील आणि आमचे अतूट नाते नाते नेहमीच राहिले आहे. वकील क्षेत्राबद्दल नेहमीच मला आकर्षण राहिले आहे. सिंधुदुर्गवासी व तुम्हा सर्वांच्या साथीने सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गतिमान विकास साध्य करणार. वकिलांचे प्रश्न सोडवण्यासाठीही नेहमीच प्रयत्नशील राहीन. असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्य पालकमंत्री नितेश राणे यांनी मालवण येथे बोलताना केले.

 

सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशन आणि माजी अध्यक्ष तथा ॲड. संग्राम देसाई विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित ‘सिंधुदुर्ग ॲडव्होकेट प्रीमियर लीग’ या वकील सहभागतील लेदर बॉल क्रिकेट स्पर्धा मालवण टोपीवाला बोर्डिंग मैदान येथे संपन्न झाल्या. स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते संपन्न झाला. स्पर्धेत ॲड. श्रीकांत पन्हाळे 11 सातारा संघ विजेता तर आरजे वॉरियर कोल्हापूर संघ उपविजेता ठरला. यांसह सिंधुदुर्ग व सांगली संघ तृतीय व चतुर्थ क्रमांकाचा मानकरी ठराला. स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी म्हणून बेस्ट बॅटर आशिष शिंदे, बेस्ट बॉलर प्रफुल्ल पवार, मॅन ऑफ दि सिरीज निलेश राजे भोसले यांना सन्मानित करण्यात आले.

 

रविवारी सुरुवातीला महिला वकीलांचे दोन प्रदर्शनीय क्रिकेट सामने आयोजित करण्यात आले. त्यात सिंधुकन्या मालवण संघ विजेता तर शिवकन्या कुडाळ संघ उपविजेता ठरला. यात बेस्ट बॅटर रश्मी मोंडकर व बेस्ट बॉलर म्हणून रीना बंगे यांना सन्मानित करण्यात आले.

 

स्पर्धा अतिशय उत्सहात संपन्न झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच वकीलांचे क्रिकेट सामने एवढ्या भव्य स्वरूपात संपन्न झाले. ॲड. संग्राम देसाई आणि सर्व वकील सहकारी यांनी अतिशय नियोजनबद्ध आणि दर्जेदार स्वरूपात आयोजन केलेल्या यां स्पर्धेचे मंत्री नितेश राणे यांनी विशेष कौतुक केले.

 

यावेळी ॲड. संग्राम देसाई विद्यमान सदस्य बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा, जिल्हा अध्यक्ष ॲड. परिमल नाईक, ॲड. विवेक मांडकुलकर, ॲड. नीलिमा गावडे, ॲड. गजानन बांदेकर, ॲड. यतिश खानोलकर, ॲड. अक्षय चिंदरकर, ॲड. अमोल सामंत, ॲड. अमृता मोंडकर, ॲड. सुरेंद्र मळगावकर, ॲड. राजीव बिले, ॲड. राजेश परुळेकर, ॲड. राजा फणसेकर, ॲड. संदीप राणे, ॲड. रुपेश देसाई, ॲड. समीर गावाणकर, मालवण अध्यक्ष ॲड. सतीशकुमार धामापूरकर, ॲड. अक्षय सामंत, ॲड. स्वरूप पई, ॲड. अविनाश परब, ॲड. निखिल गावडे, ॲड. आनंद गवंडे, ॲड. अमित पालव, ॲड. अंबरीश गावडे, ॲड. सुमित जाधव, ॲड. मिलिंद सुकाळी, ॲड. हरेश्वर गरगटे, ॲड. दिलीप ठाकुर, ॲड. गिरीष गिरकर, ॲड. नितीन कुंटे, ॲड. हर्षद तरवडकर, ॲड. मिहीर भणगे, ॲड. महेश बावकर, ॲड. सुदर्शन गिरसागर, ॲड. विलास परब, ॲड. शैलेश प्रभू, ॲड. सोनल पालव, ॲड. रश्मी मोंडकर, ॲड. पूजा शेडगे, ॲड. समृद्धी आसोलकर, ॲड. ऐश्वर्या गोवेकर यांसह अन्य वकील तसेच भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, मालवण शहर अध्यक्ष बाबा मोंडकर, माजी नगराध्यक्ष अशोक तोडणकर, माजी नगरसेविका ममता वराडकर यांसह अन्य उपस्थित होते.

 

बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा सदस्य ॲड. संग्राम देसाई म्हणाले राणे कुटुंबियांचे जिल्ह्याशी जिव्हाळ्याचे नाते नेहमीच राहिले. यां स्पर्धेच्या निमित्ताने अधिवेशनात व्यस्त असतानाही आमदार निलेश राणे स्पर्धा उदघाट सोहळ्यास तर पालकमंत्री नितेश राणे यांनी पारितोषिक वितरण सोहळ्यास उपस्थिती दर्शवली. यापूर्वीही कुडाळ, देवगड न्यायालय इमारत उभारणी तसेच अनेक बबतीत त्यांचे योगदान महत्वपूर्ण राहिले आहे. आताही मालवण व अन्य न्यायालय इमारत नूतनीकरण तसेच तळोजा येथील वकील अकॅडमी व अन्य काही प्रश्ना बाबत मंत्री नितेश राणे यांचे लक्ष वेधत मुख्यमंत्री स्तरावर आपण हे प्रश्न सोडवल असा विश्वास ॲड. संग्राम देसाई यांनी व्यक्त केला. त्याला मंत्री नितेश राणे यांनी सकारात्मकता दर्शवली.

 

*वकील व्हायची इच्छा होती पण…*

 

मंत्री नितेश राणे म्हणाले, वकील क्षेत्राबद्दल मला नेहमीच आकर्षण राहिले. राजकारणात येण्यापूर्वी वकील होण्याची इच्छा होती. मात्र वडिलांनी परवानगी दिली नाही. आज आमदार, मंत्री म्हणून जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. असाही विशेष उल्लेख मंत्री नितेश राणे यांनी केला.

 

*मुख्यमंत्री लाडका मंत्री योजनेचा मी लाभार्थी*

 

मंत्री नितेश राणे म्हणाले जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि गतिमान विकासासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री लाडका मंत्री योजनेचा मी लाभार्थी आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न प्राध्यान्याने सोडवण्यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील राहीन. असे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट केले.