कळंबणी नजीक वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

खेड(प्रतिनिधी)

 

मुंबई गोवा महामार्ग वरील कळंब णी गावडे वाडी फाटा नजीक एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडके मध्ये ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना २१ मार्च रोजी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास घडली

 

नारायण दगडू शिगवण रा कळंबणी गावडे वाडी असे त्या जागीच मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे तो पायी चालत जात असताना एका अज्ञात वाहन चालकाने जोरदार धडक दिली या धडकेत शिगवण या तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली या अपघाता नंतर अज्ञात कार चालक घटनास्थळी न थांबता पलायन केले या प्रकरणी येथील पोलिसांनी अज्ञात कार चालकावर गुन्हा दाखल केला आहे