राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या गीतांसह लोकगीत व भक्तीगीतेही सादर
सावंतवाडी । प्रतिनिधी : कारागृहात असलेले बंदी देखील कलाकार असतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये कोणती ना कोणती कला ही दडलेली असते. याच अंगीभूत कलेला वाव देण्यासाठी व जीवनाच्या खऱ्या व चांगल्या बाजूचे दर्शन घडविण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
सदर कार्यक्रमामुळे बद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत होण्यास निश्चित मदत होईल, असे मत जिल्हा कारागृह अधीक्षक सतिश कांबळे यांनी व्यक्त केले.
सांस्कृतिक कार्यविभाग महाराष्ट्र शासनामार्फत अप्पर पोलिस महासंचालक व महानिरिक्षणालय कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पूणे यांच्या सहकार्याने कारागृहामधील बंद्यांमध्ये राष्ट्रप्रेम जागृत करणाऱ्या तसेच बंद्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणाऱ्या प्रबोधनात्मक व मनोरंजानात्मक स्वरुप असणाऱ्या ‘जीवन गाणे गातच जावे ‘ सांस्कृतिक कार्यक्रमाचे सावंतवाडी जिल्हा कारागृहात आयोजन करण्यात आले होते.
सावंतवाडी जिल्हा कारागृह अधीक्षक सतिश कांबळे
यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विशाल कांबळे व त्यांचे सहा सहकारी या कलाकरांनी देशभक्तीपर गीत, छत्रपती शिवाजी महाराजांचे जिवनावरील गीत, महापुरुषांचे जिवनावर गीत, लोकगीत, भक्तीगीत, हिंदी व मराठी गाण्याचे उत्तम सादरीकरण केले. सदर कार्यक्रमात पुरुष व महिला बंद्यांचा उत्स्फुत प्रतिसाद लाभला.
सदर कार्यक्रमासाठी सांस्कृतिक कार्यविभाग, महाराष्ट्र शासन, डॉ. सुहास वारके (भा.पो.से.) अप्पर पोलिस महासंचालक व महानिरिक्षणालय कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पूणे, डॉ. जालिंदर सुपेकर (भा.पो.से.) विशेष पोलिस महानिरिक्षक (मुख्यालय) कारागृह व सुधारसेवा महाराष्ट्र राज्य पूणे व योगेश देसाई, कारागृह उपमहानिरिक्षक, दक्षिण विभाग भायखळा मुबंई यांचे मार्गदर्शन लाभले.
सदर उपक्रमामध्ये यशस्वी नियोजनासाठी सतिश कांबळे अधीक्षक, सावंतवाडी जिल्हा कारागृह, सावंतवाडी, संदिप एकशिंगे वरिष्ठ तुरुंगाधिकारी, श्री महादेव गवस सुभेदार, संदीप शेट्ये सुभेदार, श्रेयस मयेकर लिपीक व विवेक जाधव लिपीक यांनी कामकाज पाहिले.











