शिरगावात महाआरोग्य शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
शिरगाव (प्रतिनिधी): जिल्हा परिषद सिंधुदुर्ग अंतर्गत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, देवगड व शिरगाव प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सिंधू आरोग्य मेळावा’ अंतर्गत शिरगाव येथे महाआरोग्य शिबिराचे आयोजन रविवारी करण्यात आले.यावेळी तब्बल २३५ ग्रामस्थांनी विविध आरोग्य तपासण्या करून घेत या उपक्रमाचा लाभ घेतला.
या शिबिराचे उद्घाटन भाजप जिल्हा सरचिटणीस संदीप साटम यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनप्रसंगी त्यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील ग्रामस्थांना तज्ज्ञ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही काळाची गरज आहे. अशा आरोग्य शिबिरांमुळे आरोग्याविषयी जनजागृती होते.आणि ग्रामस्थांना वेळेवर योग्य उपचार मिळतात. असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी या उपक्रमाचे विशेष कौतुक करत शासनाच्या आरोग्य सेवा पोहोचवण्याच्या कार्याचे उल्लेखनीय योगदान असल्याचे नमूद केले.
या शिबिरात हृदयविकार, कॅन्सर, बालरोग, स्त्रीरोग, नेत्र तपासणी, अस्थिरोग तपासणी, प्री-कॅन्सर तपासणी तसेच सामान्य आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत करण्यात आली. आरोग्य सेवा सर्वसामान्य ग्रामस्थापर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी सामाजिक कार्यकर्ते मिलिंद साटम, शिरगाव उपसरपंच संतोष कुमार फाटक, तोरसोळे सरपंच तेजस्विनी पवार, हडपिड सरपंच संध्या राणे, ओंबळ सरपंच अरुण पवार, शिरगाव ग्रामपंचायत सदस्य मंगेश थोपटे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिबिरात अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. सचिन डोंगरे, स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. संजय विटकर, अस्थिरोग तज्ज्ञ डॉ. निलेश पाकळे, सर्जन डॉ. विद्यादर तायशेटे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील, आरोग्य विस्तार अधिकारी श्रीमती प्रतिभा वळंजु, तसेच डॉ. शितल चव्हाण, डॉ. प्रांजल वाळवे, डॉ. अमित मेस्त्री, डॉ. संघराज चव्हाण, डॉ. चित्रा पाटील, डॉ. मयुरी साटम, नेत्रचिकित्सक डॉ. मारुती सावंत, शिवानी चिवटे यांच्यासह आरोग्य सेवक व सेविका उपस्थित होते.
प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा प्रभावी पोहचविण्यासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे महाराष्ट्र शासन व पालक मंत्री नितेश राणे यांचे उपस्थितीतांनी कौतुक करून आभार मानले.
या उपक्रमामुळे गावपातळीवर आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलण्यात आले आहे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वप्नील झोरे यांनी केले.










