खेड(प्रतिनिधी)
आंबवली येथे श्री झोलाई देवीच्या शिमगोत्सवानिमित्त श्री झोलाई क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत वेरळच्या छत्रपती शिवाजीराजे संघाने विजेतेपद पटकावले. तिसंगीच्या अष्टविनायक संघाला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.
फुरुसच्या काळकाई कृपा संघाने तृतीय, तर आंबवलीच्या झोलाई युवा प्रतिष्ठान संघाने चतुर्थ क्रमांक मिळवला. उत्कृष्ट चढाई भैरू गावडे, उत्कृष्ट पकड अक्षय कारीदी, तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून रोशन शिर्के यांना गौरवण्यात आले. स्पर्धा निरीक्षक म्हणून दीपक यादव, पंचप्रमुख शरद भोसले, पंच अमोल दळवी, संतोष शिर्के, महेश मर्चडे, स्वप्निल बैकर, उल्हास शेलार, दिनेश पदुमले यांनी काम पाहिले.
गृहराज्यमंत्री योगेश कदम, जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, महेश मोरे, सद्गुरू कदम यांनी खेळाडूंचे कौतुक केले.
तसेच क्रिकेट स्पर्धेत लोटे संघ विजेता, तर हुंबरी संघ उपविजेता ठरला. नृत्य स्पर्धेत ओमसाई डान्स अॅकॅडमी खेड, मयुरी व लतिका उतेकर, ओमसाई डान्स अॅकॅडमी, तर लहान गटात आरूषी मोरे, शुभ्रा कदम, ईश्वरी शिर्के यांनी पहिले तीन व कल्याणी उतेकर, वेदिका मोरे यांना उत्तेजनार्थ क्रमांक पटकावले.
यशस्वीतेसाठी मंडळाचे अध्यक्ष अनंत पवार, उपाध्यक्ष दीपक यादव, संदीप यादव, अनिल यादव, विकास यादव, कृष्णा यादव, संजय यादव, प्रभाकर यादव, गणेश यादव, सुनील यादव आदींनी प्रयत्न केले.










