Two dumpers transporting illegal sawdust seized
सावंतवाडी : मळेवाड धाकोरे येथे अनधिकृत चिरे वाहतूक करणारे दोन डंपर सावंतवाडी तहसीलदार अरुण उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विनायक कोदे यांच्या पथकाने ताब्यात घेत कारवाई केली.अनधिकृत रित्या जांभा दगडाची वाहतूक करणारे वाहन क्रमांक GA 03 K 2228 व GA 11 T 3024 ही दोन वाहने जप्त करून तहसील कार्यालय सावंतवाडी येथे जमा करण्यात आली.
असून पुढील दंडात्मक कारवाई सुरू असल्याची माहिती कोदे यांनी दिली आहे. तसेच धाकोरे येथील विनापरवाना जांभा दगडाचे उत्खनन होत असलेल्या खाणीवर दंडात्मक कारवाई करणेबाबत सावंतवाडी तहसीलदार उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही सुरू असल्याचेही कोदे यांनी सांगितले. गेल्यात आठवड्यात मळेवाड,आजगाव,धाकोरे या परिसरात अनधिकृत विनापरवाना चिरेखाणी सुरू असून त्याच्यावर कारवाई करा म्हणून मनसेने सावंतवाडी तहसीलदार उंडे यांची भेट घेऊन निवेदन दिले होते.विनापरवाना जांभा दगड वाहतूक करणाऱ्या गाड्या वरील कारवाईमुळे मनसेने दिलेल्या निवेदनाची महसूल विभागाने दखल घेतल्याचे दिसून येत आहे.या कारवाईमुळे विनापरवाना उत्खनन करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहेत.