दापोली | प्रतिनिधी : दापोली तालुक्यामध्ये महाराष्ट्र शासन अशिष्य विभागाच्या राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत उपजिल्हा रुग्णालय दापोलीचे वैद्यकिय अधिसक डॉ. – पवन सावंत आणि तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली आर. बी. एस. के. पथकातील वैद्यकीय अधिकारी, औषधनिर्माण अधिकारी व आरोग्यसेविका यांच्या मार्फत 1 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये शाळा व अंगणवाड्यांमध्ये आरोग्य तपासणी शिबीर मोहिम राबवण्यात आली. यामध्ये 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. किरकोळ आजारांवर उपचार करून विशेष आजार, जन्मजात व्यंग, इ. वर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.











