महाराष्ट्र नवनिर्माण सेना मुंढर शाखा आयोजित उद्या”पालखी नृत्य सोहळा”

जिल्ह्यातील नामवंत पालखी नृत्य पथक होणार सहभागी

मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांचे आयोजन

मोडकाआगर | वार्ताहर : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (गुहागर विधानसभा क्षेत्र) मुंढर शाखा आयोजित व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद सिताराम गांधी यांच्यावतीने “पालखी नृत्य सोहळा” उद्या मंगळवार दि. १ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी ७ ते रात्र ११ वा. पर्यंत
मुंढर मनसे शाखा कार्यालयासमोर पटांगणात आयोजित करण्यात आला आहे. या पालखी नृत्य सोहळ्याचे उद्घाटन मुंढर गावची ग्रामदेवता स्वयंभू सोमेश्वर देवस्थानचे अध्यक्ष प्रमोद शिर्के, सचिव डॉ. प्रकाश शिर्के व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे.या पालखी नृत्य सोहळ्यात जिल्ह्यातील नामवंत पालखी नृत्य पथक सहभागी होणार आहेत.

 

पालखी नृत्य सोहळ्यात श्री स्वयंभू सोमेश्वर पालखी नृत्य पथक, मुंढर,
श्री खेम वरदान पालखी नृत्य पथक, पालपेणे,श्री चंडीकाई देवी पालखी नृत्य पथक, मळण,श्री पद्मावती देवी पालखी नृत्य पथक, मार्गताम्हाने
श्री साई सेवा महिला मंडळ, आंबेशेत ता. रत्नागिरी आदी संघ सहभागी होणार आहेत. या पालखी नृत्य सोहळ्याचे सूत्रसंचालन
वैभव पवार करणार आहे.