महाडमध्ये जहाल नक्षलवादी गजाआड

खेड (प्रतिनिधी) रायगड जिल्ह्यातील महाड एमआयडीसी हद्दीत बिहार स्पेशल टास्क फोर्स आणि महाड एमआयडीसी पोलिसांनी संयुक्तरित्या २७ रोजी मध्यरात्री जहाल नक्षलवादाच्या मुसक्या आवळल्या. जेरबंद करण्यात आलेल्या संशयित नक्षलवादाचे नाव गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. संशयित मध्यप्रदेश येथील रहिवासी असल्याचे समजते.

महाड एमआयडीसीहद्दीतील काळ भैरवनगर येथून नक्षलवाद्याला अटक करण्यात आली. अटकेतील नक्षलवाद्यावर बिहारमध्ये देशविरोधी कारवाईचे गुन्हे दाखल होते. याशिवाय मध्यप्रदेश येथे त्याने एकाचा खून केला होता. हा संशयित महाड एमआयडीसीत गेल्या दीड महिन्यापासून बिगारीचे काम करत होता. याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे मिळालेल्या माहितीनुसार, बिहार स्पेशल टास्क फोर्स व महाड एमआयडीसी पोलीस यांनी त्याच्यावर पाळत ठेवत शिताफिने अटक केली.