‘रत्नदुर्ग’ च्या महाद्वाराजवळ प्रथमच उभी राहिली गुढी

गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरीच्या ‘गड तिथे गुढी’ संकल्पनेंतर्गत उपक्रम

गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात, पारंपरिक पद्धतीने साजरा

रत्नागिरी | प्रतिनिधी : गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरी मार्फत ‘गड तिथे गुढी’ संकल्पनेंतर्गत रत्नागिरीतील ऐतिहासिक रत्नदुर्ग किल्ल्यावर महादरवाजाजवळ गुढीपाडवा सोहळा मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

सकाळी ९:०० वाजता पारंपरिक पद्धतीने गुढी उभारण्यात आली. त्यानंतर विधिवत पूजा-अर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या गौरवशाली इतिहासाचे स्मरण करण्यात आले. तसेच गडकिल्ले संवर्धनाची शप्पथ घेण्यात आली. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान (रत्नागिरी विभाग) यांच्या मावळ्यांनी तसेच रणरागिणींनी विशेष मेहनत घेतली. या कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेंद्र मांडवकर व त्यांचे सहकारी यांनी विशेष सहभाग घेतला.

खूप वर्षे दुर्लक्षित असलेला रत्नदुर्ग किल्ल्याच्या महादरवाजा जवळ पहिल्यांदाच गुढी उभारण्यात आली. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरीने हा महादरवाजा लोकांसमोर आणला आहे. गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान मार्फत हि परंपरा कायमस्वरूपी सुरु राहील या दृष्टीने प्रयत्नशील राहील. व गडकिल्ले हे आपल्या हिंदू धर्माचे केंद्रबिंदू आहेत आणि त्याचे जातं करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे असा संदेश यावेळी प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आला. या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, रत्नागिरीच्या वतीने जिल्हाध्यक्ष दिपेश विठ्ठल वारंग यांच्यासह मानसी सुभाष चव्हाण (महिला अध्यक्ष), तन्मय जाधव (संपर्क प्रमुख), समृद्धी चाळके (सांस्कृतिक विभाग प्रमुख), मयूर भितळे, भूमिका सुरेंद्र चंदरकर, सलोनी मिलिंद सुर्वे, सानिया राहुल पवार, प्रीतम मांडवकर, सेजल भार्गव मेस्त्री, शुभम आग्रे, सुमित कदम, आदित्य कांबळे, अंकुर मांडवकर, शुभांगी निशिकांत जाधव,
शशिकांत नारायण जाधव आदि उपस्थित होते.