सोशल मिडियावर कोणतीही अफवा पसरवू नका-माजी आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांचे आवाहन

होळी उत्सव, शिवजयंती, रमजान सण शांततेने व सौहार्दाने साजरे करूया

राजापूर (प्रतिनिधी): राजापूरची परंपरा ही शांततेची व सलोख्याची आहे. आपण सगळयांनीच आपले सण पारंपारिक पध्दतीने व आनंदाने साजरे करून ती परंपरा जपली पाहिजे. सोशल मिडियावर कोणतेही चुकीचे व विसंगत मेसेज पाठवून अफवा पसरवू नयेत असे आवाहन माजी आमदार ॲड. सौ. हुस्नबानूयू खलिफे यांनी केले आहे. राजापूर ही देवभूमी आहे आणि श्री देव धूतपापेश्वरांना सर्व राजापूरवासीय मान देतात, ही परंपरा आणि श्रध्दा आपण सगळयांनी जपली पाहिजे असेही त्यांनी नमुद केले.
राजापुरातील गेल्या तीन दिवसांतील घटनांबाबत शनिवारी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राजापूर शहरामध्ये होळी उत्सवानिमित्त घडलेला प्रसंग हा वेदनादायक पोलिस प्रशासन व हिंदू मुस्लिम समाजातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेऊन प्रकरण हाताळून शांतता प्रस्थापित केली आहे. सोशल मिडियावर याबाबत विसंगत असे मेसेज पसरविले जात आहेत ते पसरवले जावू नयेत असे आवाहनही खलिफे यांनी केले. या घटनेला कोणीही राजकिय रंगही देऊ नये असेही त्यांनी नमुद केल.

 

जी काही घटाना घडली ती आता घडून गेली आहे. त्यामुळे आता कुणीही हिंदू मुस्लिम बांधवांनी काहीही चुकीचे मेसेज व पोस्ट सोशल मीडियावर टाकू नयेत, समाजात शांतता व सलोखा ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. आगामी काळात होळी उत्सव, शिवजयंतीचा उत्सव, रमजान महिना, ईद, असे सण होणार आहेत. हे सर्व सण आपण सगळयांनी पारंपारिक पध्दतीने शांततेने व सौहार्दाने साजरे करून त्याचा आनंद लुटूया असे आवाहनही ॲड. सौ. हुस्नबानू खलिफे यांनी केले आहे.