युवा उद्योजक राजेश गावडे याचे आकस्मिक निधन

दोडामार्ग शहरांत हळहळ 

दोडामार्ग l प्रतिनिधी 

दोडामार्ग शहरातील युवा उद्योजक राजेश राजन गावडे वय वर्षे ३० (मुळ गाव तळवडे) याचे सोमवारी सकाळी आकस्मिक निधन झाले. त्याला बरे वाटत नसल्याने दोडामार्ग रुग्णालय येथे तात्काळ दाखल करण्यात आले होते. पण त्याचे उपचारा दरम्यान निधन झाले. त्याच्या निधनाचे वृत्त समजताच दोडामार्ग शहरातील व्यापारी युवा वर्ग नातेवाईक यांनी दोडामार्ग रुग्णालय येथे गर्दी केली होती.

 

राजेश गावडे हा युवा उद्योजक म्हणून पुढे येत असताना नियतीने त्याला साथ दिली नाही. त्याच्या आकस्मिक निधनामुळे दोडामार्ग शहरात हळहळ व्यक्त होत आहे. दोडामार्ग रुग्णालय शवविच्छेदन केल्यावर मृतदेह नातेवाईक यांच्या ताब्यात देण्यात आला. त्याच्या पश्चात आई वडील, बहीण असा परिवार आहे. दोडामार्ग येथील सेवानिवृत केंद्र प्रमुख गुरुदास कुबल व ॲड भुवन कुबल यांचा तो भाचा होता. त्याच्या अचानक जाण्याने शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे