In the result of twelth, Konkan won again
कोकण बोर्ड 96.01 टक्के निकालासह राज्यात अव्वल
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून 2023 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर होत आहे. दुपारी 2 वाजता सर्व विद्यार्थ्यांना आपला निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. ऑनलाईन निकाल जाहीर होण्यापूर्वी शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. शिक्षण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, राज्याचा एकूण निकाल 91.25 टक्के इतका लागला आहे.
यंदाच्या वर्षी बारावीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने घेण्यात आलेली होती. त्यामुळे विभागनिहाय निकालाची टक्केवारी पाहता कोकण विभाग अव्वल स्थानी असून मुंबईचा निकाल सर्वात कमी लागला आहे. कोकण विभागाचा निकाल 96.01 टक्के लागला असून मुंबईचा निकाला 88.13 टक्के लागला आहे.











