जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या नेतृत्वात केला पक्षप्रवेश
सावंतवाडी । प्रतिनिधी : शिरशिंगे गावातील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य ज्ञानदेव राऊळ आणि पंढरी राणे यांच्यासह राणेवाडी येथील अनेक ग्रामस्थांनी बुधवारी शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. संजू परब यांनी या सर्वांचे स्वागत करीत त्यांना पक्षात योग्य तो सन्मान दिला जाईल अशी ग्वाही दिली.
यावेळी ग्रामस्थांनी बोलताना सांगितले की, माजी मंत्री व आमदार दिपक केसरकर आणि युवा नेते व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब यांच्या प्रयत्नातून त्यांच्या गावातील अनेक विकासकामे मार्गी लागली आहेत. यापुढेही गावाचा विकास साधण्यासाठी ते शिवसेनेसोबत राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. ग्रामस्थांनी यावेळी आपल्या विविध समस्या संजू परब यांच्यासमोर मांडल्या, ज्यावर लवकरच तोडगा काढण्याचे आश्वासन श्री. परब यांनी दिले.
या पक्षप्रवेश सोहळ्याला शिवसेनेचे तालुकाप्रमुख नारायण उर्फ बबन राणे, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, नंदू शिरोडकर, महिला संघटक श्रीमती सेजल लाड, उपतालुकाप्रमुख जीवन लाड, श्रीमती उज्वला नाईक, श्रीमती उज्वला राऊत, सुभेदार सुरेश घावरे, मनोहर घावरे, प्रभाकर घावरे, नारायण घावरे, गंगाराम राऊळ, प्रकाश जाधव, महादेव जाधव यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना संजू परब म्हणाले की, सत्तेच्या पाठिंब्याशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे विकासासाठी सर्वांनी आमदार दिपक केसरकर यांना साथ देणे गरजेचे आहे. त्यांनी ग्रामस्थांच्या पायवाटेच्या प्रश्नावर बोलताना सांगितले की, येत्या मे महिन्यापर्यंत हा प्रश्न नक्कीच सोडवला जाईल. राजकारणासोबत सामाजिक कार्यही महत्त्वाचे असल्याचे सांगून त्यांनी शिक्षण आणि आरोग्याच्या समस्यांसाठी मदतीची गरज असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन केले.
शिवसेना प्रवेश करताना विकासकामे मार्गी लावण्याचा आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा निर्धार त्यांनी केला होता, असेही ते म्हणाले. प्रवेशकर्त्यांनी आमदार दिपक केसरकर आणि त्यांच्यावर जो विश्वास दाखवला आहे, तो नक्कीच सार्थ ठरवला जाईल. “तुम्ही माझ्या कुटुंबातील सदस्य आहात आणि तुमचे कुटुंब हेच माझे कुटुंब समजून मी तुमच्या पाठीशी कायम उभा राहीन,” असा शब्द त्यांनी यावेळी दिला.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये सुवर्णलता राणे, स्वरा राणे, संचिता राणे, आदित्य राणे, शैलेश राणे, रघुनाथ राणे, मनोज धोंड, सावित्री धोंड, दशरथ राऊळ, दर्शना राऊळ, लक्ष्मी राऊळ, राजेश राऊळ, उदय नाईक, उज्वला नाईक, कृष्णा नाईक, रुक्मिणी नाईक, कृष्णा घाडी, राजश्री घाडी, साबाजी राऊळ, रामदास घाडी, गोविंद घाडी, स्वप्निल सावंत, साहिल सावंत, सोमा मेस्त्री, गणपत मेस्त्री, दीपक मेस्त्री, समीर आमुणेकर, वंदना आमुणेकर, राधाबाई मोहिते, सायली मोहिते, सुरेश मोहिते, शैलेंद्र मोहिते, राजेश राऊळ, साहिल गवस, विशाल गवस, रोशन गवस, विनोद राणे, महादेव राणे आदींचा समावेश आहे.












