तेजस, जनशताब्दी १५ एप्रिल पर्यंत दादरला

खेड (प्रतिनिधी)सीएसएमटी मुंबई स्थानकातील फलाट क्र. १२ आणि १३च्या विस्तारीकरणाचे काम पुन्हा हाती घेण्यात आले आहे. यामुळे मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेससह मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस १५ एप्रिलपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार असल्याचे प्रशासनाने  जाहीर केले.आहे
सीएसएमटी स्थानकातील फलाट क्रमांक १२ आणि १३ च्या विस्तारीकरणाच्या कामांमुळे यापूर्वी ३१ मार्चपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावलेल्या तेजससह जनशताब्दी एक्सप्रेस १ एप्रिलपासून सीएसएमटीपर्यंत धावू लागल्या होत्या. पुन्हा विस्तारीकरणाच्या कामांमुळे २२१२० क्रमांकाची मडगाव-सीएसएमटी तेजस एक्सप्रेस आणि १२०५२ क्रमांकाच्या मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्सप्रेस १५ एप्रिलपर्यंत दादर स्थानकापर्यंत धावणार आहे. १२१३४ क्रमांकाची मंगळूर-सीएसएमटी एक्सप्रेसही १५ एप्रिलपर्यंत ठाणे स्थानकातपर्यंतच धावणार असल्याने प्रवाशांना पुन्हा मनस्ताप सहन करावा लागणार आहे.