परितोष कंकाळ यांची नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त पदी पदोन्नती..
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले नगरपरिषद मुख्याधिकारी पदाचा हेमंत मारुती किरुळकर यांनी कार्यभार स्वीकारला. ते पुणे महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. नगरपरिषदेतर्फे त्यांचे स्वागत करण्यात आले.
दरम्यान येथील मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांची नागपूर महानगरपालिका येथे सहाय्यक आयुक्त म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांनी आपल्या कालखंडात वेंगुर्ले शहरात चांगले विकासात्मक काम केले.











