हेदलीमधील झोलाई केदारनाथ काळकाई त्रैवार्षिक जत्रौत्सव १२ एप्रिल पासून

खेड(प्रतिनिधी)खेड तालुक्यातील हेदली येथील श्री झोलाई केदारनाथ काळकाई त्रैवार्षिक जत्रौत्सव गांव देवी मंदीर हेदली,  येथे १२ ते १५ एप्रिल या कालावधीत पार पडणार आहे या निमित्ताने विविध कार्यक्रम पार पडणार आहेत
१२ रोजी लाटेची मिरवणूक  हेदली म्हादेवाडी, श्री. तुकाराम शांताराम म्हादे यांचे निवास स्थान ते हेदली गाव देवी मंदिर, १३ रोजी दुपारी ३ ते ६ लाट चढवणे , १४ रोजी रिघवान, निगडे पालखी आगमन रात्री सांस्कृतिक कार्यक्रम मराठमोळं गाणं हा कार्यक्रम होणार आहे. १५ रोजी   बोरज, तिसंगी, ऐनवरे, आंबये पालखी आगमन लाट फिरविणे व पालखी नृत्य पार पडणार आहे.
या कार्यक्रमाला गृह राज्यमंत्री ना. योगेश कदम, माजी पर्यावरण मंत्री रामदासभाई कदम, माजी आमदार संजयराव कदम,  जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस बाबाजीराव जाधव, माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर, सुनिल मोरे, बावाशेठ चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.