गोव्यावरून येणारी 93 लाख किंमतीची बनावट दारू जप्त

 

चिपळूण एक्साईज विभागाची मोठी कारवाई

 

रत्नागिरी | प्रतिनिधी :राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ वर अवैद्य मद्याची तस्क्री रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडुन ठिक ठिकाणी तपासणीनाके व गस्ती मोहिम राबविण्यात आली आहे. याचं दरम्यान, राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभाग यांनी राष्ट्रीय महामार्गावर अचानक वाहन तपासणी व गस्त घालत असताना खात्रीशीर बातमी मिळालेवरून राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वरील मौजे वालोपे गावचे हददीत चिपळूण रेल्वे स्टेशन फाट्याजवळ सापळा रचला. त्यामध्ये दि. २५/०५/२०२३ रोजी दुपारी १६.३० वा. चे सुमारास चिपळुणकडून पनवेलच्या दिशेने येणा-या वाहनांची कसून तपासणी करीत असताना एक संशयित “पांढ-या रंगाचा क्र. MH-09-FL-5724″ तपासणीसाठी थांबवुन सदर वाहनाची झडती घेतली. त्या ट्रकच्या मार्ग हौद्यामध्ये मागच्या बाजूस सु. २० किलो क्षमतेच्या कोळसा पावडरने भरलेल्या एकूण १२५ पोलीथीन गोणा असल्याच्या आढळून आल्या. या गोणींच्या आड कागदी पुठ्याचे बॉक्स दिसून आले. या बॉक्समध्ये काय आहे? ते पाहिले असता त्यामध्ये ‘आईस मॅजीक (ऑरेंज फ्लेवर वोडका) आणि ‘आईस मॅजीक (ग्रीन अॅपल वोडका) या दोन ब्रेडचे ७५० मी.ली. क्षमतेच्या एकूण ९५० बाक्स मध्ये ११४०० इतक्या कंपनी सीलबंद बाटल्या मिळून आल्या.

 

सदरील विदेशी मद्याची अंदाजे किं.रु. ६८,४०,०००/- व ट्रकची अंदाजे किं.रु. २४,००,०००/- कोळसा पावडर ची किं.रु.१२५००/- व विवो कंपनीचा एक मोबाईल त्याची अं. किं.रु. १०,०००/- असे एकूण रु. ९२,६२,५००/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

 

सदरील गोवा राज्यातून वाहतूक करून आणलेला विदेशी मद्याचा साठा मिळून आला. परंतु सदर मद्याचे उत्पादन हे गोवा राज्यातच झालेला असून सदरील मद्याच्या बाटल्यांवरील लेबलवरील तपशील तपासले असता ते “M/s.Distilled Blended And Bottled by Dreams Spirits” plot No. 23 Industrial Arca Maharashtra (For Sale In The State of Maharashtra) तसेच त्यावर एम. आर. पी. नमूद नसलेले असे कागदी लेबले चीटकविलेले निदर्शनास आले. वाहन चालकाकडील बिल्टी तपासली असता सदर बिल्टीवर मे ग्रीन अग्रो इंडस्ट्रीज नॉर्थ गोवा या कंपनी कडून Indonesian coal या वस्तूचे E-Way Bill No. 133858463724 दि. २३/०५/२०२३ मे.राधाकृष्ण ट्रेडिंग कंपनी बी-१ ग्राउंड फ्लोअर, देवी विहार सी.एच.एस.ली. आग्रा रोड लालचौकी कल्याण (प) जि.ठाणे महाराष्ट्र- ४२१३०१ व Invoice No. 2023-24-203 दि. २३/०५/२०२३ वाहन क्र. MH-09-FL-5725 असे नमूद असलेली बिल्टी मिळून आली असून बोगस कागदपत्राचे आधारे गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात विदेशी मद्याची वहातुक करीत असताना मिळून आला आहे. सदर ट्रकमध्ये मिळून आलेल्या विदेशी मद्याचा साठा हा विना परवाना बेकायदेशीपणे महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून वाहतूक करीत असल्याचे निदर्शनात आल्याने सदरील ट्रकचा चालक सुरेश हरिबा पाटील रा. मु.पो. शिवाजीनगर कडेगाव ता. कडेगाव जि. सांगली यास चौकशीसाठी ताब्यात घेण्यात येऊन त्यांचेवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65 (अ) (ई) 90, 81 व 83 अन्वये या कार्यालयात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदरील अवैद्य विदेशी मद्याची वाहतूक करण्यामागे मुख्य सुत्रधार कोण आहे? याबाबत वाहन चालक सुरेश पाटील याची कसून चौकशी केली असता त्याचा पुतण्या ओंकार हनमंत पाटील (रा. मलकापूर अहिल्यानगर ता. कराड जि.सातारा) हा सर्व व्यवहार करीत असल्याचे समजते.

 

सदर कारवाईमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी व संचालक सुनिल चव्हाण यांचे आदेशान्वये तसेच विजय चिंचाळकर, विभागीय उपआयुक्त, कोल्हापुर व रत्नागिरी जिल्हयाचे जिल्हा अधीक्षक सागर धोमकर यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनाखाली

राज्य उत्पादन शुल्क चिपळूण विभागाचे निरीक्षक व्ही. एस. मासमार दुय्यम निरीक्षक जयसिंग खुटावळे, गणेश नाईक, सहा. दु. निरीक्षक राजेंद्र भालेकर, तसेच जवान सावळाराम वड, यांनी भाग घेऊन कामगिरी बजावली आहे. तसेच श्री. तुषार शिवलकर व सिद्धार्थ जाधव यांनी सदर कारवाईकामी मदत केली. वरील गुन्हयांचा पुढिल तपास निरीक्षक श्री. व्ही.एस. मासमार करीत आहेत.