गुहागरची सुकन्या आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे यांना पीएच. डी. प्रदान

पाटपन्हाळे | वार्ताहर : आंतरराष्ट्रीय खेळाडू योगिता खाडे यांना मुंबई विद्यापीठाकडून नुकतीच पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली. डॅा. योगिता खाडे यांनी ‘ रत्नागिरी जिल्ह्याच्या १९ वर्ष खालील पुरुष रग्बी खेळाडूच्या बायो मोटर क्षमता आणि शारीरिक बदलांवर उच्च तीव्रतेच्या मध्यांतर प्रशिक्षणाचा प्रभाव या विषयामध्ये शारीरिक शिक्षण विभाग, मुंबई विद्यापीठ, विभागप्रमुख डॉ. वासंती कधीरावण यांच्या मार्गदर्शनाने पुर्ण केली. दि.१९ ऑक्टोबर २०२२ रोजी ओपन डिफेन्स व्हिवा आणि निकाल जाहीर झाला होता. त्याच प्रमाणे दि. २३ फेब्रुवारी २०२३ रोजी भाऊ महेश खाडे, बहीण ज्योती जाधव,विशाखा पाटील यांच्या उपस्थितीत ही पदवी स्वीकारली आणि कोकणातील पीएच.डी. पदवी मिळवणारी पहिली खेळाडू ठरली आहे.
विद्यापीठातील संशोधन मार्गदर्शक डॉ. मनोहर माने, डॉ. विश्वंभर जाधव,डॉ. नीलेश लोहार, डॉ. माधुरी सदगीर, डॅा विशाल मढवी, डॅा प्रशांत दाभने यांचे त्यांना मार्गदर्शन लाभले. डॅा. विजय तांदळेकर, डॅा सुषमा काळे, डॅा. श्रद्धा गंभीर डॅा. शोनन पडते सर्व आफीस स्टाफ यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. न्यु इंग्लिश स्कूल पटपन्हाळे ज्युनियर व सिनियर कॅालेजचे मुख्याध्यापक, प्राचार्य, संस्थेचे चेअरमन भालचंद्र चव्हाण,खेळाडू व कोकण वासियांकडून अभिनंदन केले जात आहे.