RATNAGIRI: झोपडीत सुरु होती गावठी दारू विक्री; पोलिसांची कारवाई

Liquor was being sold in huts in the village; Police action

रत्नागिरी | प्रतिनिधी :  शहरानजीकच्या मिरजोळे ऑक्टेल कंपनीसमोर बेकायदेशिरपणे गावठी हातभटटीची दारु विक्रीसाठी बाळगणार्‍या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई मंगळवार 23 मे रोजी रात्री 8 वा.करण्यात आली.

अजित रघुनाथ शिंदे (रा.रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.मंगळवारी रात्री शहर पोलिसांचे पथक मिरजोळ परिसरात गस्त घालत असताना त्यांना ऑक्टेल कंपनीसमोर रस्त्याच्या बाजुला प्लॅस्टिक कागद मारुप तयार केलेल्या झोपडीत संशयित अजित शिंदे गावठी दारु विक्रीसाठी आपल्याजवळ बाळगून असताना ही कारवाई करण्यात आली.त्याच्याविरोधात महाराष्ट्र दारु अधिनियम कायदा 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.