खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील मांडवे, खवटी, खोपी बिटातील नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बीट विस्तार अधिकारी संतोष भोसले यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
नासा इस्रो, नवोदय व शिष्यवृत्ती परीक्षेत खवटी, मांडवे बीटातील विद्यार्थी चमकले. यामुळे तीनही बीटांचां नावलौकिक झाला. सर्व विद्यार्थ्यांना विस्तार अधिकारी संतोष भोसले यांचे मार्गदर्शन लाभले. मार्गदर्शक शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. याप्रसंगी तीनही बीटातील शिक्षक उपस्थित होते.











