खेड (प्रतिनिधी) तालुक्यातील. घाणेखुंट-कातळवाडी येथील २७वर्षे तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान आकस्मिक मृत्यू झाला. भावेश भिकू बैकर असे मृत तरुणाचे नाव आहे.
तरुणाला दारूचे व्यसन होते. पोटदुखीच्या त्रासानंतर त्याला आलेल्या अशक्तपणामुळे उपचारासाठी लोटेमाळ येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयांत दाखल करण्यात आले असता त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे.











