खेड :अतिवृष्टीमुळे वाडीमालदे गावाजवळ दरड कोसळली

खेड (प्रतिनिधी)एसटी बस वाहतूक खोळंबली

ग्रामस्थांच्या श्रमदानाने रस्ता मोकळा झाला –

१९ जून २०२५ रोजी खेड तालुक्यात मुसळधार पाऊस पडत असुन या पावसाचा तडाखा सुमारगडाच्या पायथ्याशी वसलेल्या वाडीमालदे गावाला बसला आहे.सकाळी ६ वाजता च्या दरम्यान वाडीमालदे रस्त्यावर दरड कोसळल्यामुळे सकाळची नांदिवली खेड एसटी बस काही वेळ वाडीमालदे गावाजवळ थांबली होती.

 

सदर घटनेची माहिती वाडीमालदे गावातील ग्रामस्थांना समजल्यानंतर ग्रामस्थांनी तातडीने धाव घेऊन शासकीय मदतीची अपेक्षा न बाळगता श्रमदानाने रस्त्यावरील दरडी हटवून एसटी बस चा मार्ग मोकळा करून दिला.या श्रमदानात वाडीमालदे गावातील पुढील ग्रामस्थांनी महत्वाचे योगदान दिले आहे.भार्गव तुकाराम चव्हाण (पोलिस पाटील), दिनेश रावजी चव्हाण, शाहू रावजी चव्हाण,

ज्या ज्या वेळी संकटे येतात त्या त्या वेळी मदतीला धावून जाण्याची परंपरा वाडीमालदे गावातील ग्रामस्थांनी आजही कायम जपली आहे.वाडीमालदे गावातील बहादुर मावळ्यांचे कौतुक सर्वत्र होत आहे.