सिंधुरत्न योजना ठरतेय तरुणांचा आधार – गृहराज्यमंत्री योगेश कदम

खेड येथे कार्यशाळा – २४० गाय व म्हैंशीचे वाटप
खेड(प्रतिनिधी)सिं धुरत्न योजना ही तरुणांचा आधार ठरत असून गेली अनेक वर्ष रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये या योजनेमार्फत अनेक शेतकरी व तरुण वर्ग आर्थिक सधन झालेला पाहायला मिळत आहे. त्यामुळे ही योजना तरुणांचा आधार बनत असून  याठिकाणी ५१० लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देताना मला समाधान मिळत आहे अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिली.
 खेड येथे सिंधुरत्न योजनेतंर्गत तालुकास्तरीय कार्यशाळा तसेच खरीप हंगाम २०२५ पूर्वतयारी आढावा बैठक येथील द ग तटकरे सभागृहात पार पडली यावेळी ना. कदम बोलत होते.
या कार्यशाळे दरम्यान खेड तालुक्यातील आंबये येथील सुभाष जाधव यांना कृषी यांत्रिकीकरण योजने अंतर्गत ट्रॅक्टर वाटप करण्यात आला. तसेच २४० लाभार्थ्यांना गाई व म्हैशीं, ६६ शेळ्या व अन्य कृषी साहित्याचे व औषधांचे वाटप करण्यात आले. या दरम्यान खेड तालुक्यातील १००००, दापोली – ११०००, मंडणगड – १०००० लाभार्थ्यांना आंबा फळपिकाचे फळमाशी पासून संरक्षणासाठी कृषी विभागामार्फत रक्षक सापळे वाटप व हे सापळे कसे वापरावे या संदर्भात प्रात्यक्षिक घेण्यात आले. तर शेती पिकांचे वन्य व भटके प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी चे प्रतिबंधक औषधाचे खेड – २१६, दापोली – २१६, मंडणगड – २१६ लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत औषध वाटप करण्यात आले.
सिंधुरत्न योजने अंतर्गत आंबा बागायतदारांना आंबा वाहतुकीसाठी एकूण २१ लक्ष ७८ हजार अनुदान रकमेचे ७ लाभार्थ्यांना कृषी विभागामार्फत पूर्व संमती पत्रे मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आली. तर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत खेड तालुक्यात एकूण २०२४-२५ मध्ये एकूण ३२५ लाभार्थ्यांच्या १९२.२ हे क्षेत्रावर कृषी विभागामार्फत फळबाग लागवड कार्यक्रम राबविण्यात आला. पंचायत समिती सेस योजनेंतर्गत सन २०२४- २५ आर्थिक वर्षात ६६ लाभार्थ्यांना ताडपत्री वाटप करण्यात आले. या कार्यशाळेसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख सचिन धाडवे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.