खा. नारायण राणे यांच्या दीर्घायुष्यासाठी श्री बांदेश्वराला साकडे

बांदा l प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त बांदा शहर भाजपच्या वतीने स्वयंभू श्री बांदेश्वर मंदिरात पूजा व अभिषेक करण्यात आला. यावेळी पुरोहितांनी खा. नारायणराव राणे यांच्या दीर्घायुषी व निरोगी आरोग्यासाठी श्री बांदेश्वराला साकडे घातले.

 

यावेळी भाजपा महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष श्वेता कोरगावकर, सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, भाजपा युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब, माजी सभापती शितल राऊळ, देवस्थान समिती अध्यक्ष बाळू सावंत, ग्रा. पं. सदस्य श्रिया केसरकर, प्रशांत बांदेकर, माजी सरपंच दीपक सावंत, माजी ग्रा. पं. सदस्य मकरंद तोरसकर, राजेश विरनोडकर, भाजप शहर अध्यक्ष बाबा काणेकर, निलेश कदम, शैलेश केसरकर, गुरू कल्याणकर, सिद्धेश महाजन, प्रवीण नाटेकर, नंदू महाजन, मनोज कल्याणकर, राकेश केसरकर, गुरुनाथ सावंत आदींसह महायुती कार्यकर्ते उपस्थित होते.