मसुरे | झुंजार पेडणेकर
बै नाथ पै सेवांगण कट्टा येथे गोधडी प्रशिक्षण वर्ग आयोजन करण्यात आले होते.मातृमंदिर देवरुखच्या तज्ञ मार्गदर्शिका
सौ अंजली माळी त्यांच्या सहकारी
कु रुपा जोयशी व कु दीपाली जोयशी
यांच्या मार्गदर्शना खाली
महिलाना प्रशिक्षण दिले
दोन दिवस हे प्रशिक्षण संपन्न झाले.
गोधडी आणि रजई तयार करून एखादी महिला उदरनिर्वाह करू शकते हे
माळी मॅडम यानी यावेळी संगीतले.
उपस्थित सर्व महिलानी
अत्यंत आत्मीयतेने व आवडीने या प्रशिक्षणाचा लाभ घेतला.गोधडी या बरोबरच पाय पुसणी व बटवा याचंही प्रशिक्षण झालं.समारोप कार्यक्रमात
सौ मेस्त्री, सौ सरमळकर, कुमारी चव्हाण यानी आपल्या मनोगतात अत्यंत कुशल प्रशिक्षणाबद्दल माळी मॅडम व सहकार्यांचे आभार मानले. सौ माळी मॅडम यानी प्रशिक्षणार्थी यांच्या शिकण्याच्या आवडीबद्दल आनंद व्यक्त करून गरज पडल्यास आपण पुन्हा प्रशिक्षण घेण्यास तयार असल्याचे नमूद केले.
यावेळी आरती कांबळी यानी मनोगत व्यक्त केले.
सौ अजली माळी व सहकार्यांचा सेवांगण च्या वतीने स्मृतिचिन्ह व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
प्रशिक्षण वर्गाचे नियोजन सुजाता पावसकर आणि बाळकृष्ण गोंधळी यानी केले.किशोर शिरोडकर, दीपक भोगटे, बापू
तळावडेकर, मनोज काळसेकर, आरती कांबळी, सौ मठकर उपस्थित होते.